Advertisements
Advertisements
Question
वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
Answer in Brief
Solution
- वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसताना, बाहयउद्दीपनास प्रतिसाद म्हणून त्यांच्या कोणत्याही भागाची हालचाल होते, कधी कधी त्यामध्ये वाढही होते. अशा हालचालींना 'वृद्धी-संलग्न' आणि 'वृद्धी-असंलग्न' हालचाली म्हणतात, ज्या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. या हालचालींना 'अनुवर्तन' किंवा 'अनुवर्ती हालचाल' असेही म्हणतात.
- या अनुवर्तन हालचाली विविध प्रकारच्या असू शकतात जसे:
- प्रकाशानुवर्ती हालचाल: वतस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते. प्रकाशाच्या दिशेने वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात.
- गुरुत्वानुवर्ती हालचाल: वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दिपनांना प्रतिसाद देते. याला गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणतात.
- जलानुवर्ती हालचाल: वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते. याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात.
- रसायन-अनुवर्तन: विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन-अनुवर्तन असे म्हणतात. उदा. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ.
- ह्या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित असल्याने, त्या वृद्धी-संलग्न हालचाली म्हणून ओळखल्या जातात.
- वनस्पतींतील वृद्धी-असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसून, भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून, वनस्पतीतील संप्रेरके विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात.
- लाजाळूसारख्या वनस्पती विदयुत-रासायनिक आदेशांचा उपयोग करतात.
- वनस्पती पेशी आपल्या आतील पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करतात, ज्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते.
shaalaa.com
वनस्पतींमधील समन्वय
Is there an error in this question or solution?