Advertisements
Advertisements
Question
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
गर - गार
Solution
गर - फळातला आतला भाग
गार - थंड
RELATED QUESTIONS
या शब्दगटातील विशेषणे ओळखा:
काव्यात्म, अवस्था, साहित्यकृती, विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या, उत्तम
परिमळ पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.
वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब |
क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय | उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय |
खालील शब्दाचे वचन बदला.
माणूस -
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती वाईट दिसते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही.
______! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते.
उदा.,
- टेप आणा आपटे.
- तो कवी ईशाला शाई विकतो.
- ती होडी जाडी होती.
- हाच तो चहा.
- सर जाताना प्या ताजा रस.
- काका, वाचवा, काका.
तुम्हीही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पाहा कशी गंमत येते.
रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.
पाऊस सुरु झाला. पाऊस ______
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आव्हान-आवाहन
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
रया जाणे.