Advertisements
Advertisements
Question
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?
Solution
मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून व्यक्तिमत्व या बाबीचा व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाशी संबंध नसून तिचा व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यांच्याशी आयुष्यभरासाठी संबंध असतो. 'व्यक्तिमत्व' या शब्दासाठी इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी (Personality) हा प्रतिशब्द वापरण्यात येतो.
पर्सनॅलिटी हा शब्द “पर्सोना" (Persona) या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मुखवटा असा होतो.
पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकांमधील भूमिका वठवताना भूमिकेप्रमाणे मुखवटेपरिधान करत. तेव्हापासून व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे 'व्यक्तिमत्व' असा शब्द रूढ झाला.
नॉर्मन मन यांच्या मते, “व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय”.
गॉर्डन ऑलपोर्ट यांच्या मते, “व्यक्तीचे वैशिष्टपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय.”