Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा.
Long Answer
Solution
मानसशास्त्रज्ञ बुद्धिमापनासाठी आज अनेक चाचण्याचा वापर करत आहेत. या सर्व चाचण्यांचे चार प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे:
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बीने यांची बुद्धिमापन चाचणी, वेश्लर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉ. भाटीया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस् यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो.
- मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनःस्थिती, हावभाव इत्यादींविषयीची अधिक माहिती मिळू शकते.
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्त खर्च होतात.
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी, चाचण्यांच्या गुणदानासाठी व प्राप्तांकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते.
- वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते.
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळेया चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही.
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही.
- वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात.
- सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- भाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा (शब्दांचा किंवा अंकांचा) वापर करतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. आर्मी आल्फा टेस्ट, वेश्लर ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल (WAIS) इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
- भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात.
- या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुध्दीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात.
- भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
- इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत.
- भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत.
- भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात, परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही. त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे (१) कृती चाचणी आणि (२) पेपर - पेन्सिल चाचणी असे दोन प्रकार पडतात.
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
- इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापानासाठी उपयुक्त ठरतात.
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येतात.
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत.
- या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरुपात मापन करीत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुध्दी असलेल्या व्यक्तींमध्ये भेद करू शकत नाहीत.
- अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे:
shaalaa.com
बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार
Is there an error in this question or solution?