SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 21st February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना :-
- सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच कृती लिहून घेऊ नयेत.
- विभाग - 5 उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. 1. (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) रिकाम्या जागा पूर्ण करा:
- गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे - ______
- मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत - ______
फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे: जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी॥ ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा:
(3) स्वमत:
चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ. स. 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्य करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य ! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मत:च महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. |
(1) आकृती पूर्ण करा: (2)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्य | |
जटिल कार्य | अटीतटीचे कार्य |
____________ | ____________ |
(2) नावे लिहा: (2)
- महर्षी कर्वे यांचे जन्मगाव.............
- वाङ्मयाची जननी.............
(3) स्वमत: (3)
'स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे,' या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा: 2
-
- तहान लागली की आपण सरबत पितो.
- काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात.
- व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते.
- थकवा आला की आपण काम करतो.
जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते. आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही. |
(2) विधाने पूर्ण करा: 2
- ते न चुकता केले जाते, जे ______.
- आपण तेव्हा झोपतो, जेव्हा आपल्याला ______.
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कृती करा: 2
मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील दोन ओळी शोधून लिहा.
- ...............................
- ...............................
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यांतून. ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, 'तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.' ती म्हणते, 'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?' मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. तशी हसून म्हणते ती, 'आता तू.' मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम; मग शोधतो पातेलं भाजीसाठी... हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतांनाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे. एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. |
(2) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा: 2
- घराचा झरोका
- भातुकलीचा खेळ
(3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: 2
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं.
(4) काव्यसौंदर्य: 2
'माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं',
या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
मुद्दे | ‘उत्तमलक्षण’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ................. |
(ii) कवितेचा विषय | ................. |
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ................. |
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
मुद्दे | 'आकाशी झेप घे रे' |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ................. |
(ii) कवितेचा विषय | ................. |
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ................. |
Chapter:
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:
'तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.' |
Chapter:
'माणसे पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Chapter: [0.102] मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन)
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
Chapter: [0.152] वीरांगना (स्थूलवाचन)
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
Chapter: [0.20199999999999999] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
योग्य जोड्या लावा:
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) आईवडील | (i) कर्मधारय समास |
(ii) पंचवटी | (ii) समाहार द्वंद्व समास |
(iii) महाराष्ट्र | (iii) द्विगू समास |
(iv) चहापाणी | (iv) इतरेतर द्वंद्व समास |
Chapter:
खालील तक्ता पूर्ण करा:
(भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नाउमेद)
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द |
Chapter:
Advertisements
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
निष्कासित करणे.
Chapter:
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मुग्ध होणे
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पित्त खवळणे.
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अचंबित होणे.
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा:
इतरांना मार्ग दाखवणारा -
Chapter:
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा:
वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे -
Chapter:
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई - ______
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
दुकानदार - [दुकान व दार हे शब्द वगळून]
Chapter:
अचूक शब्द ओळखा.
नीर्मीती
निर्मिती
नीर्मिती
निर्मीती
Chapter:
अचूक शब्द ओळखा.
सुशिक्षित
सुशीक्षीत
सूशिक्षित
सुशिक्षीत
Chapter:
अचूक शब्द ओळखा.
ऐतीहासीक
ऐतिहासीक
ऐतिहासिक
एतीहासिक
Chapter:
अचूक शब्द ओळखा.
परिस्थिती
परीस्थीती
परिस्थीती
परीस्थिती
Chapter:
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
?
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
Advertisements
खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
Drama
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
खालील शब्दाचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
Bookstall
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
अक्षरधारा वाचनालय चिपळूण शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा |
यश इरा गुप्ते वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.
Chapter:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा: (6)
अक्षरधारा वाचनालय चिपळूण शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा यश/इरा गुप्ते |
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. [email protected] या मेल आयडी वर हे पत्र पाठवा.
Chapter:
जे केलेच पाहिजे ते करावयाचे राहून जाते. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. हे सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडून जाते. काही गोष्टी स्वभावानुसार, गरजेनुसार केल्या जातात. तहान लागली की आपण पाणी पितो, भुकेच्या वेळी खातो. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो; पण शरीरश्रम किंवा व्यायाम मुद्दाम कधीच करीत नाही. लहानपणी धावणे, पळणे, खेळणे खूप होते. मोठेपणी यातले मागे काही उरत नाही. स्त्रियांना तर त्यांच्या दिनचर्येची चाकोरी सोडून बाजूला सरकता येत नाही. हाल अधिक, पण हालचाल कमी अशी त्यांची स्थिती असते. आपल्या जीवनातील अनेक दुःखे केवळ शारीरिक हालचालींच्या आणि विशेषतः सर्वांगीण व शिस्तबद्ध व्यायामाच्या अभावातून निर्माण होतात; हे एक साधे सरळ जीवनसत्य माणसांना उमगत नाही. |
वरील गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
'जनता विद्यालय, महाड' या विद्यालयात नावीन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा.
Chapter:
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा:
गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते. त्यासाठी वीस रुपये आईने केतनला दिले होते. केतनने पैसे पँटच्या खिशात ठेवले आणि तो निघाला. वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला होता. खेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि ..................................................... .................................................................................................. .................................................................................................. |
Chapter:
चित्रलीला निकेतन, आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दि. 24 डिसेंबर वेळ - दु. 4.00 प्रमुख पाहुणे - श्री. अभय नगरकर - प्रसिद्ध चित्रकार |
वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावाचे/बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Chapter:
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
Chapter:
'प्रदूषण-समस्या व उपाय' या विषयावर तुमचे विचार लिहा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi [मराठी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi [मराठी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.