Advertisements
Advertisements
प्रश्न
6 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 15π सेमी2 आहे, तर त्या पाकळीच्या कंसाचे माप काढा व वर्तुळकंसाची लांबी काढा.
उत्तर
दिलेले: त्रिज्या (r) = 6 सेमी,
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = 15π सेमी2
शोधा:
i. वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप (θ),
ii. वर्तुळकंसाची लांबी (l)
उकल:
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `θ/360 xx pir^2`
∴ `15pi = θ/360 xx pi xx 6^2`
∴ `15pi = θ/360 xx pi xx 36`
∴ `15 = θ/10`
∴ θ = 150°
तसेच, वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `(वर्तुळकंसाची लांबी xx त्रिज्या)/2`
∴ `15pi = (l xx 6)/2`
∴ l = `(15pi xx 2)/6 = 5pi` सेमी
∴ वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप 150° आहे व वर्तुळकंसाची लांबी 5π सेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका वर्तुळकंसाचे माप 80° आणि त्रिज्या 18 सेमी आहे, तर त्या वर्तुळकंसाची लांबी शोधा. (π = 3.14)
15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.
आकृतीमध्ये, बिंदू O हे वर्तुळपाकळीचे केंद्र आहे. ∠ROQ = ∠MON = 60°, OR = 7 सेमी, OM = 21 सेमी, तर कंस RXQ व कंस MYN ची लांबी काढा. `(π = 22/7)`
44 सेमी लांबी असलेल्या वर्तुळकंसाचे माप 160° असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती?