Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती मध्ये मुलांचे एक खेळणे आहे. ते एक अर्धगोल व एक शंकू यांच्या सहाय्याने केले आहे. आकृतीत दर्शविलेल्या मापांवरून खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा. (π = 3.14)
उत्तर
दिलेले: शंकूसाठी,
उंची (h) = 4 सेमी, त्रिज्या (r) = 3 सेमी,
अर्धगोलासाठी,
त्रिज्या (r) = 3 सेमी
शोधा: खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ
उकल:
शंकूची तिरकस उंची (l) = `sqrt(r^2 + h^2)`
= `sqrt(3^2 + 4^2)`
= `sqrt(9 + 16)`
= `sqrt25`
= 5 सेमी
शंकूचे घनफळ = `1/3pir^2h`
= `1/3 xx pi xx 3^2 xx 4`
= 12π सेमी3
शंकूचे वक्रपृष्ठफळ = πrl
= π × 3 × 5
= 15π सेमी2
अर्धगोलाचे घनफळ = `2/3pir^3`
= `2/3 xx pi xx 3^3` = 18π सेमी3
अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ = 2πr2
= 2 × π × 32 = 18π सेमी2
आता, खेळण्याचे घनफळ = शंकूचे घनफळ + अर्धगोलाचे घनफळ
= 12π + 18π
= 30π = 30 × 3.14
= 94.20 सेमी3
तसेच, खेळण्याचे पृष्ठफळ = शंकूचे वक्रपृष्ठफळ + अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ
= 15π + 18π
= 33π
= 33 × 3.14
= 103.62 सेमी2
∴ त्या खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ अनुक्रमे 94.20 सेमी3 व 103.62 सेमी2 आहे.