Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.
आपत्ती व्यवस्थापनाची उदि्दष्टे कोणती?
उत्तर
आपत्ती व्यवस्थापन उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
- आपत्ती येते तेव्हा मानवावर जीवितहानीचे संकट येते. त्यातून जास्तीत जास्त लोकांची सुटका करणे.
- आपत्तीनंतर येणाऱ्या अन्न व पाणी तुटवड्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते. या वस्तू आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवणे. त्यायोगे समाजाला वाटणारी असुरक्षितता, आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे.
- आपत्तीग्रस्तांच्या जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणणे. आपत्तीग्रस्त प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे.
- आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे.
- भविष्यात येणाऱ्या आपत्तीवर संरक्षणात्मक उपाय योजून अशा आपत्तींची झळ लोकांना पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे.
संबंधित प्रश्न
तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?
असे का म्हणतात ते स्पष्ट करा.
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.
खालील तक्ता पूर्ण करा.
खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.