Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
उत्तर
'ध्यानीमनी' या नाट्यउताऱ्यात शालूवहिनीच्या व्यक्तिरेखेतून नाटककार प्रशांत दळवी यांनी आईपणाची मूर्ती साकार केली आहे. अपत्यप्राप्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला परमोच्च आनंद असतो. 'मातृत्व' हे स्त्रीच्या जीवनातले साफल्य आहे. निसर्गतः आईपणाची ओढ स्त्रीला असते. शालूवहिनीही या गोष्टीला अपवाद नाही. तिला अपत्य होत नाही; म्हणून मानसिक पातळीवर 'मोहित' नावाचे काल्पनिक बाळाचे अस्तित्व ती मानते व त्याच्यावर इतकी माया करते की ती सत्य जगातच वावरते आहे, असे वाटू लागते. डॉ. समीरला शालू वहिनी मानसिक रुग्ण वाटते; परंतु शालू वहिनी त्याला मोहितच्या दैनंदिन जगण्याच्या बारीकसारीक गोष्टी तपशीलवार सांगते. तिच्या आंतरिक इच्छेला तिने 'मोहित' नावाचे शरीर दिलेले आहे. यातून नाटककाराने आईला असलेली पुत्रप्रेमाची ओढ अधोरेखित केली आहे.
प्रत्येक स्त्रीच्या मनात ममत्व आणि वात्सल्य यांचा नैसर्गिक झरा वाहत असतो. पुत्रप्राप्तीनंतर हेच वात्सल्य साकार होते व तिच्या आयुष्याची परिपूर्ती होते. अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम आहे, तेच प्रत्येक मातेच्या हृदयात वसत असते आणि प्रत्येकाचीच आई शालसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते. या विधानातून सत्यता पटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
खालील कृती करा.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
पपांचा पांगुळगाडा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मुलांचे चिमणे विश्व
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.