Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
उत्तर
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वत:च्या सत्कार समारभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एस.टी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांच्या नाटकाचा निस्सिम चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला आनंदाचे भरते येते. ते इतके की तो थेट ट्रेनमध्येच कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे ही त्याच्या ध्यानात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना, त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही हा चाहता स्वत:च्या आनंदात मश्गूल असतो. “माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबुल करत असाल तरच मी तुमचे पाय सोडेन.” अशी धमकीवजा सूचना तो कृष्णराव यांना करतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांचे पाय गदागदा हालवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार दयायला लावते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
खालील कृती करा.
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मुलांचे चिमणे विश्व
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.