Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
उत्तर
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने खालसा केली गेली. जे संस्थानिक होते, त्यांतील बहुतांश संस्थानिकांची मनोवृत्ती ही हेकेखोर होती. सत्ताधीश म्हणून त्यांच्या वर्तनात रुबाब होता, ऐट होती व नाहक तोरा होता. त्यामुळे राजा व प्रजा यांच्यामधल्या सहभावात फार दरी पडलेली होती. प्रस्तुत नाट्यउताऱ्याच्या संदर्भात यालाच राजवाडा व नंदनवाडी यांच्यातील अंतर असे म्हटले आहे.
राजा हा प्रजेचे पालन करणारा पालक असतो. प्रजेसाठी सखकारी ठरतील अशा योजना कार्यान्वित करणे, हा राजाचा धर्म आहे. त्या काळाचा विचार करता राजवाडा व नंदनवाडी यातले अंतर दूर करण्यासाठी पुढील काही उपाय करायला हवे होते. एकतर राजाने आपला राजवाडा गावापासून वेगळा ठेवायला नको. प्रजेच्या वस्तीस्थानातच राहणे पसंत करावे. राजवाड्याचा दिमाखही थोडा कमी करून कमी क्षेत्राचा राजवाडा सर्वसामान्य दिसेल असा बांधायला हवा. शिवाय प्रजेची देखे जाणून घेण्यासाठी स्वत: जातीने जनता-दरबार भरवायला हवा. प्रजेसाठी योजलेल्या सुखसोयींची अंमलबजावणी होते की नाही, हे स्वतः पाहावे अथवा त्यासाठी निष्ठावंत मंडळींचे कार्यकारी मंडळ असावे. राजेशाहीच्या अंतर्गत लोकशाही नांदायला हवी. आपले कुटुंबही राजाने प्रजेसारखेच मायेने वागवायला हवे. आपले कार्य पुढे नेणारे उत्तराधिकारी । व अनुयायी तयार करणे, हेही परम कर्तव्य समजायला हवे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
↓ |
_____________ |
↓ |
____________ |
↓ |
पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
↓ |
____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
खालील कृती करा.
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
स्वमत.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
पपांचा पांगुळगाडा.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.