Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर
'सुंदर मी होणार' या नाट्यउताऱ्यामध्ये 'ममी' अस्तित्वात नाही; पण 'मामी 'ची व्यक्तिरेखा डॉक्टरांच्या संवादातून उलगडते. महाराज जेव्हा डॉक्टरांना 'नोकरीवरून जा आणि लग्न करा'. असे दोन ओळींचे पत्र पाठवतात, तेव्हा डॉक्टर रुग्णशय्येवर मृत्युपंथाला लागलेल्या 'ममी'ला भेटायला जातात आणि ही हकिकत सांगतात. तेव्हा ममीच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. त्या डॉक्टरांना म्हणतात की, तुम्ही गेलात तर माझ्या पोरांना आई कुठली? या एका वाक्यावरून ममीच्या स्वभावाचे अनेक पैलू कळतात. पुत्रांवर प्रेम न करणारे त्यांचे पती (महाराज) हे कसे हेकेखोर आहेत, हे त्यांना माहीत असते. त्यांचे पती (महाराज) हे कसे हेकेखोर आहेत, हे त्यांना माहीत असते. त्यांचे स्वत:च्या मुलांवर भारी प्रेम असल्यामुळे आपल्या जाण्यानंतर मुलांचे आयुष्य दिशाहीन होईल, हे त्यांना उमगले होते. म्हणून डॉक्टरांना त्या राजवाड्यात थांबायला सांगतात. डॉक्टरही मी चे शब्द अविवाहित राहून पाळतात, यावरून 'ममी'बद्दल त्यांना किती आदर होता, हे कळते.
महाराजांच्या बोलण्यावरून 'ममी' किती एकाकी होत्या, हे कळते. महाराजांचे आपल्यावर तिळमात्र प्रेम नाही, हे माहीत असूनही केवळ मुलांच्या प्रेमाखातर त्या जगत होत्या. त्यांना उंची औषधाची नव्हे तर प्रेमाच्या एका शब्दाची गरज होती, तोही त्यांना आयुष्यात पतीकडन कधीच मिळाला नाही. अशा प्रकारे दु:खाने ओतप्रोत वेढलेली 'मामी' ही व्यक्तिरेखा आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
↓ |
_____________ |
↓ |
____________ |
↓ |
पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
↓ |
____________ |
कारणे लिहा.
कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
स्वमत.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
पात | प्रतिक्रिया |
राजेंद्र | |
बेबी |
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मुलांचे चिमणे विश्व
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
थोडक्यात स्पष्ट करा.
नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.