Advertisements
Advertisements
प्रश्न
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गाेष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
उत्तर
अभ्यास करायला तर मला आवडतोच; पण त्याचसोबत मला क्रिकेट खेळायला, चित्र काढायला, गाणी ऐकायला खूप आवडते. क्रिकेट खेळताना मी तर तहानभूकही विसरून जातो. टीव्हीवर मोठ्या खेळाडूंचा खेळ बघून त्यांचे तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्नही करतो. बाबा जेव्हा कौतुकाने आमचा 'सचिन तेंडुलकर' अशी ओळख करून देतात तेव्हा खूप छान वाटतं. क्रिकेटशिवाय मला चित्र काढायला, खासकरून निसर्गचित्र काढायला, त्यात विविध रंग भरायला फार आवडते. पावसाळ्यात जेव्हा मैदान ओले असते तेव्हा मी घरात बसून चित्रकलेचाच सराव करतो. दिवसातून तासभर मी टीव्हीही बघतो. डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवरील प्राण्यांवरचे कार्यक्रम मला फार आवडतात. मी बातम्याही रोज पाहतो आणि वर्तमानपत्रही रोज वाचतो. यामुळे, माझे सामान्य ज्ञान पक्के झाले आहे. अशा या छंदांमुळे माझा दिवस अगदी मजेत जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ _________________________________________________________ |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?