हिंदी

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

लेखन कौशल

उत्तर

उत्तरा देशपांडे
१०२, शांतीकुंज,
सोमवार पेठ,
पुणे - ४११००२.
दि. ३०. एप्रिल, २०१७

प्रिय सई,
सप्रेम नमस्कार,

     परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या. ह्यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे, आम्हां सर्वांना महाबळेश्वरला नेले. मी, आई, बाबा आणि राघव आम्ही सगळेच २२ तारखेला निघालो.

     सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागतो. तुला माहीत आहे? महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती.

      महाबळेश्वरमध्ये निसर्गसाैंदर्य अफाट आहे. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट, वेण्णा तलाव, काटे पॉईंट, एलिफंट पॉईंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वांत उंच पॉईंटवरून महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे.

      भारताच्या स्ट्राबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्राबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते. त्यामुळे, साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्राबेरीवर यथेच्छ ताव मारला. महाबळेश्वरमधील स्ट्राबेरी, रासबेरी, जांभळाचा मध तसेच, गुलकंद प्रसिद्ध आहे. अशा आल्हाददायक वातावरणात, ऊन्हाच्या झळांपासून दूर चार दिवस कसे गेले कळलेच नाही!

     तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते. पुढची सहल आपण नक्की एकत्र करू. तुझा अभ्यास कसा सुरू आहे? इकडे सगळे मजेत आहेत. तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग. तुझ्या पत्राची वाट बघत आहे.

                                                                                                     तुझी मैत्रीण,
                                                                                                          उत्तरा

shaalaa.com
लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.1: दादास पत्र - उपक्रम [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 5.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | पृष्ठ १६
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | पृष्ठ ३५
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 दादास पत्र
उपक्रम | Q १ | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी/बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता?


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.


मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.


घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.


तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्‌द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.


खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.


              फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?

         फुलांमध्ये दोन प्रकाची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतील. हि रंगद्रवे पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात हि रंगद्रव्ये विरघळतात.

         कोणत्या फुलांत कोणती रंगद्रवे असतात, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.


खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.

  • नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
  • ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.

दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.


‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.


तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.


खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.

एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे.

एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली.


खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.

एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला ____________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________

_________________________________________________________


शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.


'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.


‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.


खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×