Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चित्रांचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
उत्तर
स्वच्छंदी फुलपाखरू
एकदा काय झाले, एक छोटेसे, सुंदर, रंगीबेरंगी फुलपाखरू फुलांच्या ताटव्यावरून उडत होते. या फुलावरून त्या फुलावर! अचानक त्याची नजर वर उंच आभाळाकडे गेली. एक रंगीबेरंगी वस्तू निळ्या आभाळात वाऱ्यासोबत वर वर जात डुलत झुलत होती. जरा नीट पाहिल्यावर त्या फुलपाखराच्या लक्षात आले 'अरे, हा तर पतंग!' त्याला पाहून फुलपाखराच्या मनात आले 'हा पतंग किती भाग्यवान आहे! तो आभाळात उंचच उंच विहार करू शकतो. त्याला स्वत:ला त्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. वाऱ्या च्या सोबतीने तो उंच उडत जातो. वरून खाली पाहताना त्याला किती सुंदर दृश्य दिसत असेल बरे! खालच्या सर्व वस्तू, माणसे, घरे अगदी मुंगीएवढी दिसतील. आकाशातल्या ढगांना त्याला स्पर्श करता येईल. किती मजाच मजा!'
असा विचार करत असतानाच अचानक तो पतंग आभाळात दिसेनासा झाला. तो कुठे झाडाला अडकून फाटला का, की कुठे आणखी उंच ठिकाणी गेला हे पाहण्यासाठी त्या फुलपाखराने नजर इकडेतिकडे भिरभिरवली. पाहतो तर काय, तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निपचित पडला होता. तो पतंग उडवणारी मुले त्याला तिथेच टाकून क्रिकेट खेळायला गेली होती. आता पतंगाला हवेत उडणे तर सोडाच, साधे जागेवरून हलताही येत नव्हते. ते पाहून फुलपाखराच्या मनात आले 'अरे, मग मी तर किती भाग्यवान आहे! मी माझ्या मर्जीने, मुक्तपणे मला हवे तेव्हा हवे तिथे उडू शकतो, भले मला पतंगाइतके उंच उडता येत नसेल; पण मी स्वच्छंदी जीवन जगू शकतो!
क्षणा-दोन क्षणांपूर्वी पतंगाचा हेवा करणाऱ्या फुलपाखराला स्वत:च्या आयुष्याची, स्वातंत्र्याची किंमत कळली, तेव्हा त्याने देवाचे मनापासून आभार मानले.
तात्पर्य: दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानावे.
संबंधित प्रश्न
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.
'स' चा शब्दपंखा पूर्ण करा.
१. वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर.
२. जंगलातील एक भित्रा प्राणी.
३. नेहमी.
४. एक शीतपेय.
५. रस्ता.
६. उत्सव.
७. ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. रा...
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली. |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.