Advertisements
Advertisements
प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
उत्तर
एकदा भरदुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो. अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली. आमच्याकडे छत्री नव्हतीच, त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघीही ओल्याचिंब झालो होतो. आडोशाला जाईपर्यंत आमचे अंगावरचे कपडे, माझे दप्तर, त्यातली वह्या-पुस्तके एवढंच काय तर मी मैत्रिणीसाठी आणलेल्या खाऊची पिशवी पूर्ण भिजली. जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो, तेव्हा दोघींनाही थंडीने हुडहुडी भरली होती. रोज आठवणीने छत्री दप्तरात ठेवणाऱ्या परंतु आज छत्री घरी विसरलेल्या मला या प्रसंगामुळे चांगलाच धडा मिळाला होता.
संबंधित प्रश्न
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.