Advertisements
Advertisements
प्रश्न
अहवालाची प्रमुख चार अंगे लिहा.
विस्तार में उत्तर
उत्तर
- प्रास्ताविक: इथे खालील बाबींचा (मुद्दे, विषय) समावेश असणे अपेक्षित आहे. समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव-पद, प्रमुख पाहुण्यांचे नाव-पद. समारंभाच्या आयोजकांचे नाव-पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख. या सर्वांचे शाब्दिक स्वागत. दीपप्रज्वलन/प्रतिमापूजन/ईशस्तवन/स्वागतगीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो.
- अहवालाचा मध्य: कार्यक्रमांचे, समारंभांचे नियोजन, कोणाकोणाचा सहभाग होता, नेमके कोणकोणते उपक्रम झाले, त्या उपक्रमांचे फलित काय मिळाले, या संदर्भात पुढील योजना, नियोजन काय असणार आहे, यांबाबत क्रमबद्ध, मुद्देसूद विवेचन करणे अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथे लिहिणे अपेक्षित असते. प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचे भाषण, निवडक दोन-तीन उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषक वितरण समारंभ यांचा उल्लेख अपेक्षित असतो.
- अहवालाचा शेवट: कार्यक्रम, समारंभ कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात करावा. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीचा निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते.
- अहवालाची भाषा: मराठी भाषेचे स्थान, महत्त्व, सद्यःस्थिती याबाबतीत आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या-त्या क्षेत्रातील अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली असते. अशा ठरावीक भाषेचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?