Advertisements
Advertisements
प्रश्न
माहितीपत्रकाच्या रचनेची दोन वैशिष्ट्ये लिहा.
विस्तार में उत्तर
उत्तर
- सुसंगत व अचूक माहिती: नावच ‘माहिती’ पत्रक असल्याने माहितीपत्रकात ‘माहिती’ला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते, त्या हेतूशी सुसंगत, अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती (उदा., संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, वेबसाइट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी.) माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली पाहिजे. तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा.
- उपयुक्तता व परिणामकारक दक्षता: आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल; तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या (ग्राहकाच्या) जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. ‘माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल’ असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील ‘तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का?’, ‘दुधातली भेसळ ही अशी ओळखा’ अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले, की शहरी व्यक्तींनाही कृषिप्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?