HSC Commerce (English Medium)
HSC Science (General)
HSC Arts (English Medium)
HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 13th February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
- आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात.
- स्वच्छता; नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) कारणे लिहा: (२)
(य) अनेक अपघात होतात, कारण - ..........
(र) अस्वाभाविक वेग कमी करावा, कारण - ..........
(२) विधाने पूर्ण करा: (२)
(य) वाढता वेग म्हणजे ______.
(र) रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ______.
माणसे चालू आणि पळूही शकतात; पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल, अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार झाला, तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर-खाली पाहाणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीरव्यापारत अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे, हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. |
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
‘उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये’, - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) उत्तरे लिहा: (२)
(य) लेखकाला दातदुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा.
(र) लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उर्मट सवाल लिहा.
(२) परशा पहिलवानाची दोन वैशिष्ट्ये लिहा: (२)
(य) ............
(र) .............
मनुष्यस्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहेलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारीमुंड्या चीत झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. परशा हा जन्मापासून पहेलवान. रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा, की जसा काय वनराजच! छाती इतकी पुढे काढायचा, की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला, की “काय रं, कुटं निगालास?” असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ; पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. “चाललोय कुस्ती मारायला... येतोस?” “कुस्ती?” असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि “अरं, अगुदर माशी तर मार नाकावरली... मग कुस्तीचं बगू” असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा; पण गंमत अशी, की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. “लइ हाडं हैत तुझ्या अंगात! दगडावाणी लागत्यात हाताला.” असे त्याने म्हटले, की हाडाच्या बाबतीत का होईना; पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आपल्या ताकदीची-मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो ‘शिंव्ह’ म्हणायचा. स्वतःला ‘शिंव्ह’ म्हणवून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. |
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘दातदुखीच्या अनुभवाचे वर्णन’ तुमच्या शब्दांत करा.
Chapter:
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा.
(र) सूर्याला मित्र का म्हणतात ते विशद करा.
कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे. वीणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरविले, तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात. आपण सत्कृत्य केले तर त्या तारांतून गौरवाचे गोड शब्द निघतील; पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघाल्याखेरीज राहणार नाही. सदासर्वदा नम्र भाषणांनी रिझविणे हे मित्राचे कार्य नाही. आपले चुकते पाऊल जो फिरवितो; आणि जाणारा तोल जो सावरतो; तोच आपला खरा मित्र होय. मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हेत. आपल्या जीवित प्रवाहाला योग्य वळण देणारे ते तट आहेत. काजव्यांचे थवेच्या थवे जर आपल्याला दिसले तर त्यांची शोभा मोठी रमणीय वाटल्यावाचून राहात नाही. पण त्या शोभेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात रहावे लागते. आपल्याला वाममार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्यांप्रमाणे खरे मित्र नसतात. खरा मित्र सूर्यासारखा असतो. त्याच्या सान्निध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्या मनाला वाटत असतो, व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरमच वाटते, म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात की काय कोण जाणे! त्या त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतिमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते तोच खरा मित्र होय. |
(२) खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा. (२)
Chapter:
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका शब्दांत उत्तरे लिहा. (२)
(य) कवीच्या सवे गीतांपरी राहणारी ............
(र) कवीचा लळा ज्याला लागला ते ............
(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. (२)
(य) सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो ............
(र) माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही ............
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी; कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों सांगती 'तात्पर्य' माझें सारख्या खोट्या दिशा; माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी; |
(३) अभिव्यक्ती: (४)
‘सुख’ आणि ‘दुःख’ याविषयीच्या तुमच्या भावना स्वत:च्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
खालील ओळींचा अर्थ लिहा:
सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले
आरशातील स्त्रीने मला विचारले, ‘तूच ना ग ती!’
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य...!
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग
ऐक हं...! तू कशी होतीस ते!
Chapter:
ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Chapter:
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Chapter: [0.0102] रोज मातीत (कविता)
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) कथानकाचे प्रयोजन लिहा.
(र) नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा.
कथेत ‘घटना’ हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपण जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती असते. कथेला स्थळ-काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षांतूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. |
(२) कथाकाराच्या ‘पात्र’ या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)
Chapter:
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
Chapter: [0.0301] शोध
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
Chapter: [0.0302] गढी
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
Chapter:
‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.
Chapter: [0.0302] गढी
Advertisements
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी.
Chapter: [0.0401] मुलाखत
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
Chapter: [0.0404] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते स्पष्ट करा:
मुलाखतीच्या प्रश्नांची रचना-प्रश्नांमुळे निर्माण होणारे वातावरण ........ मुलाखतकाराची प्रश्न विचारण्यासंबंधीची पूर्वतयारी ........ मुलाखत घेणाऱ्याचे हावभाव ........ वेळेचे बंधन अनिवार्य.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाचे स्वरूप लिहा:
माहितीपत्रक म्हणजे .......... जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम .......... ग्राहकांना होणारे फायदे .......... माहितीपत्रकाचा हेतू .......... वेगळेपण व वैशिष्ट्ये.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा:
वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता .......... विश्वसनीयता .......... भाषेचा सोपेपणा .......... शब्दमर्यादा .......... निःपक्षपातीपणा.
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयाच्या स्त्रोताविषयी माहिती लिहा:
बातमी ........ व्यक्तिगत अनुभव ........ भेटीगाठी/संभाषण ........ सूक्ष्म निरीक्षण ........ निरीक्षणातून समोर आणले जाणारे घटक.
Chapter:
हा आनंद सर्वत्र असतो.
या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
हा आनंद कुठे नसतो?
हा आनंद कुठे असतो?
हा आनंद सर्वत्र नसतो का?
हा आनंद सर्वत्र असतो का?
Chapter: [0.0501] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
सूचनेप्रमाणे सोडवा:
किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री!
(विधानार्थी करा.)
Chapter:
Advertisements
‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
कर्मधारय समास
द्विगू समास
बहुव्रीही समास
अव्ययीभाव समास
Chapter:
‘दशदिशा’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
Chapter: [0.0501] व्याकरण - वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
‘दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागवला’ या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:
भावे प्रयोग
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
यांपैकी नाही
Chapter:
कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा:
श्वेता गाणे म्हणते.
चालकाने वेगाला आवरावे.
समीरने बक्षीस मिळवले.
कष्टाची भाकर गोड लागते.
Chapter:
फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
अनन्वय
अतिशयोक्ती
अपन्हुती
अर्थान्तरन्यास
Chapter:
‘न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ’ या वाक्यातील उपमान ओळखा:
Chapter:
‘जमीन अस्मानचा फरक असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:
खूपच फरक असणे.
खूप मोठा पराक्रम करणे.
खूप तुलना करणे.
खूप चर्चा करणे.
Chapter:
‘जमीन अस्मानचा फरक असणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
उत्साहाचा झरा: माझी आई
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता ॠतू
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रस्ता बोलतोय....
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
आंतरजाल (इंटरनेट): शाप की वरदान
Chapter:
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
शाळा बंद पडल्या तर.......
Chapter:
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam Marathi with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam.
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.