हिंदी

कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे. वीणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरविले, तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:   (२)

(य) खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा.

(र) सूर्याला मित्र का म्हणतात ते विशद करा.

             कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे. वीणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरविले, तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारा मधुर नादच निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात. आपण सत्कृत्य केले तर त्या तारांतून गौरवाचे गोड शब्द निघतील; पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघाल्याखेरीज राहणार नाही. सदासर्वदा नम्र भाषणांनी रिझविणे हे मित्राचे कार्य नाही. आपले चुकते पाऊल जो फिरवितो; आणि जाणारा तोल जो सावरतो; तोच आपला खरा मित्र होय. मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हेत. आपल्या जीवित प्रवाहाला योग्य वळण देणारे ते तट आहेत. काजव्यांचे थवेच्या थवे जर आपल्याला दिसले तर त्यांची शोभा मोठी रमणीय वाटल्यावाचून राहात नाही. पण त्या शोभेचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात रहावे लागते. आपल्याला वाममार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्यांप्रमाणे खरे मित्र नसतात. खरा मित्र सूर्यासारखा असतो. त्याच्या सान्निध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्या मनाला वाटत असतो, व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरमच वाटते, म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात की काय कोण जाणे! त्या त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतिमय सांत्वन आणि कठोर उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते तोच खरा मित्र होय.

(२) खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा.   (२)

आकलन

उत्तर

(१)

(य) खऱ्या मित्राचा धर्म कारण नसताना प्रशंसा करणे किंवा नेहमी गोड बोलणे नसून, चुका दाखवून योग्य मार्गदर्शन करणे असावे.

(र) सूर्याला मित्र म्हणतात कारण त्याच्या सान्निध्यात आपण पूर्ण प्रकाशात असतो, आणि त्याच्या उपस्थितीत काही चुकीचे करण्याची आपल्याला लाज वाटते.

(२)

  • योग्य मार्गदर्शन करणारा: चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून तो योग्य सल्ला देतो आणि चुका दाखवतो.
  • निःस्वार्थ प्रेम असलेला: तो केवळ प्रशंसा करत नाही, तर गरज असेल तेव्हा कठोर उपदेशही करतो.
  • सहानुभूतीने समजून घेणारा: तो प्रसंगी धीरगंभीर शब्द वापरतो, प्रेमळ उत्तेजन देतो आणि आधारही देतो.
  • सत्याचा आधार: खरा मित्र सूर्यासारखा असतो, जो आपल्या जीवनप्रवाहाला योग्य दिशा देतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×