हिंदी

दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणांसह स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणांसह स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

पृथ्वीवरील नैसर्गिक घटक मानवाचे नैसर्गिक किंवा भौगोलिक पर्यावरण ठरवतात. भूगोलामुळे मानव आणि त्याचे पर्यावरण यातील परस्परसंबंध अभ्यासता येतात. आधुनिक जगात मानवी हस्तक्षेप नसलेला कोणताही प्रदेश आढळत नाही. म्हणूनच भूगोलाच्या अभ्यासामुळे निसर्गाने मानवास उपलब्ध करून दिलेल्या विविध संधी आणि मानवाने निसर्गावर उमटवलेला ठसा हे दोन्ही घटक भूगोलत अभ्यासले जातात. जमिनीचा वापर किंवा भूवापर नियोजन, आर्थिक विकास इत्यादी अनेक उद्दिष्टांसाठी भूगोलाचे ज्ञान मूलभूत ठरते. शिलावरणाच्या अभ्यासामुळे खडक आणि त्याचे प्रकार, मृदा निर्मितीशी त्याचा असलेला संबंध, विविध खनिजे आणि त्यांची उपलब्धता; वातावरणाच्या अभ्यासामुळे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता यांबद्दल माहिती मिळून त्यांचा वनस्पती व वनांवर प्रभाव अभ्यासता येतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर हवामानाचे ज्ञान अतिशय महत्त्वाचे असते. हवामानाच्या अभ्यासामुळे जगाचे विविध हवामान प्रदेशात विभाजन करता येते आणि त्याप्रमाणे मानवी जीवन, राहणीमान, विकासपातळी, साधनसंपत्ती, निवास अथवा वसाहत यांची निर्मिती इत्यादींची माहिती मिळते. सागर क्षेत्राच्या अभ्यासामुळे सागरतळाची रचना, तापमान, क्षारता, तसेच सागरी संपत्तीबद्दलही माहिती प्राप्त होते. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते. जीव- भूगोलाच्या अभ्यासामुळे वनस्पती, प्राणी, त्यांचे प्रकार, वितरण आणि त्यांचे आर्थिक महत्त्व यांबाबत माहिती मिळते.
थोडक्यात, पृथ्वीवरील विविध नैसर्गिक घटक मानवाचे नैसर्गिक पर्यावरण ठरवतात आणि हे नैसर्गिक घटक मानवी व्यवसायाचे स्वरूप ठरतात. अशा तऱ्हेने मानवाचे जीवन, आर्थिक व्यवस्था आणि विकासाचे प्रारूप भूगोलाशी निगडित असते.

shaalaa.com
भूगोलाची व्याप्ती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भूगोल : स्वरूप व व्याप्ती - स्वाध्याय [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 8 भूगोल : स्वरूप व व्याप्ती
स्वाध्याय | Q ४. १) | पृष्ठ ८१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×