हिंदी

भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य.

टिप्पणी लिखिए

उत्तर

भूगोल या मूळ ज्ञानशासखेचे स्वरूप बदलत असून ते आता अधिकाधिक उपयोजित भूगोल ज्ञानशाखा म्हणून उदयास येत आहे. उपयोजित भूगोलामध्ये भूगोलातील अभ्यासविषयाच्या सर्व घटकांचा भविष्यकालीन उपयोग करणे आणि अंदाज वर्तवणे यांकडे कल वाढत आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून आता उपयोजित भूगोल अशी एक नवीन ज्ञानशाखा वेगाने विकसित होत आहे. या ज्ञानशाखेत गणितीय प्रतिकृती, संगणकीय प्रतिकृती यांचा वापर करून, तसेच प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर करून हवेची स्थिती, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील बदल, प्रदूषण, मृदा, अपक्षरण, निर्वनीकरण, आकारांची भविष्यकालीन निर्मिती या प्राकृतिक भूगोलविषयक घटकात विशेषत्वाने वापर केला गेला आहे. अशाच प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकालीन लोकसंख्या वृद्धी आणि घनता, भूमी उपयोजन, शेती करण्याचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येचे प्रारूप, औद्योगिकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांचे व्यवस्थापन अशा विविध मानवी भूगोल अभ्यासविषयातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळेच भूगोल विषयातील मूलभूत घटकांच्या सखोल ज्ञानासह (Hardskills) काही कौशल्य आत्मकज्ञानही (Softskills) आत्मसात केल्यास त्याच्या संयोजनातून भविष्यकालीन रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेकविध संधींचा खजिना भूगोल विषयाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो.

shaalaa.com
विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भूगोल : स्वरूप व व्याप्ती - स्वाध्याय [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 8 भूगोल : स्वरूप व व्याप्ती
स्वाध्याय | Q ३. ४) | पृष्ठ ८१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×