हिंदी

भूगोलाच्या शाखा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूगोलाच्या शाखा.

टिप्पणी लिखिए

उत्तर

पृथ्वीवरील विविध घटक आणि घडामोडींचा त्यामागील कार्यकारणसंबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोल शास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत. मात्र, या प्रत्येक शाखेच्या अनेकविध उपशाखा आढळतात. नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. हा अभ्यास स्थूलमानाने पृथ्वीचे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या घटकांशी संबंधित असतो. यातूनच खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, भूशास्त्र, मुद्राशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र आणि जीव भूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखांचाही विकास होत गेला. त्याच वेळेस मानवाने आपल्या बुद्धी व कौशल्याच्या जोरावर पृथ्वीवर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. यातूनच मानवी भूगोल ही भूगोलाची दुसरी प्रमुख शाखा उदयास आली. मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी असून लोकसंख्या, लोकसंख्येचे जागतिक वितरण, त्यांचे निवास, व्यवसाय, संस्कृती, संघटन प्रदेशानुसार बदलते. या सर्वांचा अभ्यास करणाऱ्या विविध उपशाखाही उदयास आल्या. आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल, शहरी भूगोल आणि वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या प्रमुख उपशाखा आहेत.
$प्राकृतिक आणि मानवी भूगोलाच्या सर्व उपशाखा या एकमेकांशी संबंधित आहेत.

shaalaa.com
विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भूगोल : स्वरूप व व्याप्ती - स्वाध्याय [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 8 भूगोल : स्वरूप व व्याप्ती
स्वाध्याय | Q ३. २) | पृष्ठ ८१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×