Advertisements
Advertisements
प्रश्न
एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा.
उत्तर
दिलेले:
पहिल्या 3 सेकंदांतील अंतर d1 = 18 मी
दुसऱ्या 3 सेकंदांतील अंतर d2 = 22 मी
तिसऱ्या 3 सेकंदांतील अंतर d3 = 14 मी
एकूण कालावधी (t) = 3 + 3 + 3 = 9 से
सरासरी चाल = ?
सूत्र: सरासरी चाल = `"एकूण अंतर"/"एकूण काल"`
आकडेमोड: सूत्रानुसार,
= `("d"_1 + "d"_2 + "d"_3)/9`
= `(18 + 22 + 14)/9`
= 6 मी/से
म्हणून वस्तूची सरासरी चाल 6 मी/से आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10g असून ती 1.5 m/s वेगाने 900g वस्तूमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा.
एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल?