Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
भारत उद्योग व ब्रझील उद्योग
अंतर स्पष्ट करें
उत्तर
भारत उद्योग | ब्रझील उद्योग | |
1. शेती | शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची शेती आहे. | ब्रझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशांत शेती हा व्यवसाय केला जातो. |
2. खाणकाम | भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध असल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांचा खाणकाम हा प्रमुख व्यवसाय आहे. भारतात कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू तसेच संगमरवर आणि दगडांच्या खाणी आहेत. | ब्रझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. याउलट, खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. ब्रझील हा देश लोहखनिज, मँग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिजसंपत्तीने संपन्न आहे. |
3. मासेमारी | भारतात मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास ४० ज्ञ् आहे; तर ६० ज्ञ् वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. | ब्रझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर सागरी मासेमारी केली जाते. ब्रझीलमध्ये अनेक नद्या असूनही गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. |
4. उद्योग | भारतात कच्च्या मालाची उपलब्धता आणि ऊर्जा साधने इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेले आहे. ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागांत विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरांतून या उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. | ब्राझीलमध्ये मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे; तर ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. |
shaalaa.com
ब्राझीलमधील उद्योग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?