Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
उत्तर
पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात. पेशी श्वसनमध्ये ग्लायकोलायसीस, क्रेब्ज चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
फरक स्पष्ट करा.
ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
फरक स्पष्ट करा.
ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन
ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.