Advertisements
Advertisements
प्रश्न
'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
१. टवटवीत | अ. जेवण |
२. चमचमीत | आ. डोळे |
३. ठणठणीत | इ. दगड |
४. बटबटीत | ई. भाजी |
५. मिळमिळीत | उ. आरोग्य |
६. गुळगुळीत | ऊ. फूल |
उत्तर
'अ' गट | 'ब' गट |
१. टवटवीत | ऊ. फूल |
२. चमचमीत | अ. जेवण |
३. ठणठणीत | उ. आरोग्य |
४. बटबटीत | आ. डोळे |
५. मिळमिळीत | ई. भाजी |
६. गुळगुळीत | इ. दगड |
संबंधित प्रश्न
सुचनेनुसार सोडवा.
'चवदार' सारखे शब्द लिहा.
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
यथामती -
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
भेटवस्तू - ______
सूचनेप्रमाणे कृती करा.
जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.
तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
गिर्यारोहण
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई - ______
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
मुले बागेत खेळत होती.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
ओळखा पाहू!
नाक आहे; पण श्वास घेत नाही. - _______
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.
सुधारक -
एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. - ______
खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
शब्दसमूह | शब्दसमूह | शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द |
१. मारियाने कुलूप | मारियाने कुलूप उघडले. | उघडले |
२. मारियाने दारे, खिडक्या | मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. | बंद केल्या |
३. मारिया आईला | मारिया आईला बिलगली. | बिलगली |
मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पाठात शोधून लिहा.
डावा × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चढणे × ______
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
अनाथ ×
खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.
अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
नाळ तुटणे-
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.