Advertisements
Advertisements
प्रश्न
जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही ती लंब असते हे सिद्ध करा.
उत्तर
समजा m आणि n या दोन समांतर रेषा आहेत आणि रेषा l ही त्यांची छेदिका आहे. समजा रेषा l ⊥ रेषा m.
रेषा m वर A आणि B ही बिंदू, रेषा n वर C आणि D ही बिंदू आणि रेषा l वर P आणि Q ही बिंदू चिन्हांकित केले आहेत.
रेषा l ही रेषा m आणि रेषा n ला अनुक्रमे K आणि L मध्ये छेदते.
रेषा l ⊥ रेषा m, तर ∠PKB = 90∘
रेषा AB || रेषा CD आहे आणि छेदिका PQ त्यांना अनुक्रमे K आणि L येथे छेदते, तर
∠KLD = ∠PKB ...(संगत काेन)
⇒ ∠KLD = 90∘
∴ रेषा l ⊥ रेषा n.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मध्ये जर किरण BA || किरण DE, ∠C = 50° आणि ∠D = 100°, तर ∠ABC चे माप काढा.
(सूचना: बिंदू C मधून रेषा AB ला समांतर रेषा काढा.)
ΔABC मध्ये ∠A = 76°, ∠B = 48°, तर ∠C चे माप ______ आहे.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील एका कोनाचे माप 75° असेल तर दुसऱ्या कोनाचे माप ______ असते.
रेषा AB || रेषा CD || रेषा EF आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. जर y : z = 3 : 7 तर x ची किंमत काढा.