Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मधील `square`ABCD मध्ये बाजू BC < बाजू AD असून बाजू BC || बाजू AD आणि जर बाजू BA ≅ बाजू CD तर ∠ABC ≅ ∠DCB हे सिद्ध करा.
उत्तर
रेख BM ⊥ रेख AD ला असे काढा की, A-M-D आणि रेख CN ⊥रेख AD जेणेकरून, A-N-D
रेख BC || रेख AD ...(पक्ष)
∴ BM = CN ...(समांतरभुज चौकोन समांतर बाजूंच्या लांबींचे अंतर समान असते.) ...(1)
∆BMA आणि ∆CND मध्ये,
∠BMA = ∠CND = 90°
कर्ण BA ≅ कर्ण CD ...(पक्ष)
रेख BM ≅ रेख CN ...[(1) वरून]
∴ ∆BMA ≅ ∆CND ...(कर्णभुजा कसोटी)
∴ ∠BAM ≅ ∠CDN ...(एकरूप त्रिकोणांचे संगत कोन)
म्हणजेच, ∠BAD ≅ ∠CDA ...(A-M-D, A-N-D) ...(2)
रेख BC || रेख AD आणि बाजू BA त्यांची छेदिका आहे. ...(पक्ष)
∴ ∠ABC + ∠BAD = 180° ...(आंतरकोन) ...(3)
रेख BC || रेख AD आणि बाजू CD त्यांची छेदिका आहे. ...(पक्ष)
∴ ∠DCB + ∠CDA = 180° ...(आंतरकोन) ...(4)
∴ ∠ABC + ∠BAD = ∠DCB + ∠CDA ...[(3) आणि (4) वरून]
∴ ∠ABC + ∠CDA = ∠DCB + ∠CDA ...[(2) वरून]
∴ ∠ABC = ∠DCB
∴ ∠ABC ≅ ∠DCB