Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
उत्तर
पाण्यात वसलेले, जगातील एकमेव अद्भुत शहर म्हणजे व्हेनिस! रस्त्यावरची (माणसांची, वाहतुकीची) वर्दळ नसलेले व्हेनिस हे जगातील एकमेव शहर होय, कारण येथे रस्ते नसून असंख्य कालवे व त्यांना जोडणारे पूल आहेत. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा, तसे हे पूल नदीच्या पात्रांवर उभारलेले आहेत.
व्हेनिस हे शहर अनेक छोट्या बेटांचा पुंजकाच आहे. हा पुंजका निळ्या, मखमली समुद्रावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा दिसतो. येथील चर्च किंवा जुन्या राजवाड्यांची उंची इतकी आहे, की यांची टोके आभाळात घुसल्याप्रमाणे वाटतात. विविध आकारांची व असंख्य प्रवाशांची ने-आण करणारी जहाजे, विस्तार्ण पसरलेला ग्रँड कॅनॉल, येथील पाणरस्ते पाहणे म्हणजे जणू अफाट जलदर्शनच असते. वातावरणात प्रसन्नता, हवेत गारवा, वाऱ्यात उत्साह, मनात संगीत आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असलेले हे शहर अद्भुत आहे. इतके अनुपम साैंदर्य लाभलेल्या शहराचे केवळ शब्दांनी वर्णन करणे अशक्य आहे. ते साैंदर्य प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे, म्हणूनच व्हेनिसचे वर्णन करता येत नाही, ते अवर्णनीय आहे, असे लेखक म्हणतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.