Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
गायबगळे
उत्तर
'काझीरंगा' या पाठात लेखक वसंत अवसरे यांनी काझीरंगा अभयारण्यातील जंगलसफारीचे रोमांचक शब्दांत वर्णन केले आहे. लेखकाला काझीरंगाच्या जंगलसफारीत गायबगळ्यांचे दर्शन झाले. आधी एक पांढराशुभ्र गायबगळा पंख हालवत डोक्यावरून उडाला तेव्हाच लेखकाने ओळखले, की जवळपास रानम्हशींचा कळप असणार. हे गायबगळे म्हशींच्या आसपासच वावरतात. म्हशी गवतातून चालतात तेव्हा गवतातले लहान कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी हे बगळे म्हशींच्या जवळपास किंवा पाठीवरही येऊन बसतात. काळ्या म्हशींच्या मधून वावरणारे पांढरे बगळे पाहून लेखकाला ती निसर्गाची काळ्यावरची पांढरी लिपी कागदावर चित्रित करण्याचाही मोह झाला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.