Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.
- अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
- अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
उत्तर
(१) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. -(उपमा अलंकार)
- ज्याची तुलना करायची ते (उपमेय) व ज्याच्याशी तुलना करायची ते (उपमान) यांच्यातील सारखेपणा चमत्कृतीपूर्ण रीतीने दाखविला जातो, तेव्हा उपमा अलंकार होतो.
- उपमेय - अब्दुल व उपमान - देवदूत यांच्यातील सारखेपणा येथे सुंदर रीतीने दर्शविला आहे.
- उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.
- उदा.
(१) आभाळागत, माया तुझी आम्हावरी राहू दे ।
(२) सावळाच रंग तुझा पावसळि नभापरी
वरील दोन्ही उदाहरणामध्ये आभाळा एवढी माया आणि सावळाच रंग हा पावसळि नभासारखा अशी तुलना करून दाखवली आहे; अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू .
(२) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
- उपमेय हे जणू काही अपमानच आहे अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अंलकार होतो.
- उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
- उदा.
(१) तिचे मुख जणू चंद्रच।
(२) त्याचे अक्षर जणू मोतीच.
वरील उदाहरणामध्ये (मुख-चंद्र, अक्षर- मोती) उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!
खालील तक्ता पूर्ण करा.
अलंकाराची वैशिष्ट्ये |
अलंकाराचे नाव |
(अ) उपमेयाचा निषेध केला जातो. |
(१) __________ |
(अ) __________________ (आ) __________________ |
(२) अनन्वय अलंकार |
(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. |
(३) __________ |
(अ) ________________________ |
(४) अतिशयोक्ती अलंकार |
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______
उपमान ओळखा:
‘सागरासारखा गंभीर सागरच।’
या वाक्यातील उपमान ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
१. उपमेयाचा निषेध केला जातो. | ______ |
२. उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. |
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’
निशिगंधासारखा निशिगंधच होय.
वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा: