मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा. अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.

  • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
  • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
थोडक्यात उत्तर

उत्तर

(१) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. -(उपमा अलंकार)

  • ज्याची तुलना करायची ते (उपमेय) व ज्याच्याशी तुलना करायची ते (उपमान) यांच्यातील सारखेपणा चमत्कृतीपूर्ण रीतीने दाखविला जातो, तेव्हा उपमा अलंकार होतो. 
  • उपमेय - अब्दुल व उपमान - देवदूत यांच्यातील सारखेपणा येथे सुंदर रीतीने दर्शविला आहे.
  • उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.
  • उदा.
    (१) आभाळागत, माया तुझी आम्हावरी राहू दे ।
    (२) सावळाच रंग तुझा पावसळि नभापरी
    वरील दोन्ही उदाहरणामध्ये आभाळा एवढी माया आणि सावळाच रंग हा पावसळि नभासारखा अशी तुलना करून दाखवली आहे; अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू .

(२) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)

  • उपमेय हे जणू काही अपमानच आहे अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अंलकार होतो.
  • उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
  • उदा.
    (१) तिचे मुख जणू चंद्रच
    (२) त्याचे अक्षर जणू मोतीच.
    वरील उदाहरणामध्ये (मुख-चंद्र, अक्षर- मोती) उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले आहे.
shaalaa.com
अलंकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 चुडीवाला
कृती | Q (६) | पृष्ठ २२

संबंधित प्रश्‍न

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!'
मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रमआचरतिल,असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

--

--

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय ?

--

--


खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.


खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______


खालील ओळीतील अलंकार ओळखा:

आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।


उपमान ओळखा:

‘सागरासारखा गंभीर सागरच।’

या वाक्यातील उपमान ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकार
१. उपमेयाचा निषेध केला जातो. ______
२. उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते.

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


खालील ओळींमध्ये कोणत्या अक्षरांचे यमक आढळते?

हिंडू ओढे, धुंडू ओहळ
झाडावरचे काढू मोहळ


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×