मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’ - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’

थोडक्यात उत्तर

उत्तर

अब्दुल हा बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणारा एक सर्वसामान्य माणूस; पण दाजीसाहेबांच्या तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांना वर्षातून दोनदा बांगड्या भरण्यासाठी तो स्वत:हून तयार झाला. दरवर्षी न चुकता, न बोलावता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो त्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. कुष्ठरोगी भगिनींच्या जीवनात आनंद, उत्साह निर्माण करत असे. 'कुष्ठरोग' हा तसा सर्वसामान्यांच्या दृष्टीने नावडता विषय. त्यातही अशा स्त्रियांच्या हातात बांगड्या भरणे हे अवघड कार्य; पण अब्दुलने हेही सहज केले. पत्नीची बोलणी सहन करत, ऐन सणांदिवशी आपले चुडीचे दुकान बंद ठेवून, स्वत:च्या फायद्याचा जराही विचार न करता तो तपोवनात जात असे व मनापासून आपले काम करत असे. मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या लेकीबाळींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यात त्याला खूप समाधान मिळत असे. सत्कार समारंभाचे निमंत्रण ऐकून त्याला आनंद झाला; पण तपोवनासाठी मी काही सत्कार करण्याएवढे कार्य केले नाही असे वाटण्याइतकी साधी, नम्र वृत्ती त्याच्याजवळ होती, म्हणून अब्दुल एक थोर समाजसेवक आहे, असे मला वाटते.

shaalaa.com
चुडीवाला
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 चुडीवाला
कृती | Q (७)(अ) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×