Advertisements
Advertisements
प्रश्न
तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर
तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय नक्कीच वाढवू शकेल. त्यासाठी त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध समाजमाध्यमांवर बांगड्यांच्या जाहिराती टाकून तो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्या जाहिरातींसोबतच आपला व्यवसाय 'डिजिटल' पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्यासाठी तो स्वत:चे 'ॲप' विकसित करू शकतो. त्या ॲपवर तऱ्हेतऱ्हेच्या बांगड्यांचे नमुने पेश करून, आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. शिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सुरू करून तो देशातच नाही, तर परदेशातूनही मागणी मिळवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.
शिवाय, बांगड्या बनवण्यासाठीची नवीन यंत्रसामग्री विकत घेऊन तो विविध प्रकारच्या (लाखेच्या, काचेच्या, प्लास्टिकच्या), विविध रंगांच्या, आकाराच्या बांगड्या बनवू शकतो व आपला व्यवसाय वाढवू शकतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.
अब्दुल | रघुभैया |
खालील विधानांमागील कारणे लिहा.
रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.
खालील विधानांमागील कारणे लिहा.
आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
गुणविशेष लिहा.
गुणविशेष लिहा.
सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.