Advertisements
Advertisements
प्रश्न
शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर
अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. इतरांप्रमाणेच आपल्या पतीनेही चांगला धंदा करावा, खूप पैसे कमवावेत, म्हणजे घर व्यवस्थित चालेल असा तिचा विचार आहे. शिवाय, ऐन सणांदिवशी, ज्यावेळी कितीतरी बायका दुकानात बांगड्या भरायला येतात त्यावेळी अब्दुल आपले दुकान बंद ठेवून तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जातो, हे तिला पटत नाही कारण, त्यामुळे चांगले पैसे कमावण्याची संधी अब्दुल गमावून बसतो. परिणामी, पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या मुलाचा साधा हट्टही पुरवता येत नाही, जमा-खर्च बसवताना ओढाताण होते, असे तिला वाटत असावे. या सर्वांचा परिणाम म्हणून अब्दुलला शन्नूची बोलणी ऐकावी लागतात; पण तिच्या अशा वागण्यामागे कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून 'आपल्या कुटुंबाचा विचार' महत्त्वाचा आहे, असे दिसते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.
अब्दुल | रघुभैया |
खालील विधानांमागील कारणे लिहा.
रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.
खालील विधानांमागील कारणे लिहा.
आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
गुणविशेष लिहा.
गुणविशेष लिहा.
सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.