हिंदी

खालील विषयावर बातमी तयार करा. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस
युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा

(आमच्या क्रीडा प्रतिनिधीकडून)

दिनांक: २५ एप्रिल

ठाणे, दि. २४ एप्रिल - आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने छायाचित्राद्वारे सचिन तेंडुलकर यांचा जीवनपट सर्वांसमोर मांडण्यात आला. क्रीडाक्षेत्रात करीअर करणाऱ्या युवक-युवतींना यातून निश्‍चितच प्रेरणा मिळाली असेल. चिकाटी, मेहनत, जिद्द या गुणांमुळे सचिन तेंडुलकर हे नाव आज जगाच्या नकाशावर अढळ झाले आहे. हा आदर्श आजच्या युवा पिढीने समोर ठेवावा, असा कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य हेतू होता. युवा हेल्थ क्लबच्या सदस्यांनी वर्षभरातल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी क्रीडाक्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या संदेशद्वारे युवा हेल्थ क्लबचे खूप कौतुक केले. युवा हेल्थ क्लबच्या अध्यक्षांनी सचिन तेंडुलकर यांच्या सदिच्छांचे वाचन केले. निरोगी मनासाठी रोजच्या धावपळीत खेळांचे स्थान टिकून राहणे गरजेचे आहे, असे युवा हेल्थ क्लबच्या सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

shaalaa.com
बातमी लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: उपयोजित लेखन - बातमी लेखन [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 15 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q कृती ३ | पृष्ठ ४९

संबंधित प्रश्न

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×