हिंदी

खालील विषयावर बातमी तयार करा. तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.

संक्षेप में उत्तर

उत्तर

तलावांनी पुसलं गावकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी

(आमच्या वार्ताहराकडून)

दिनांक: ११ ऑगस्ट

मानगाव, दि. १० ऑगस्ट येथील तलाव काठोकाठ भरून वाहत आहेत. गेले दोन दिवस मानगाव येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने तलावांनी पाण्याची कमाल पातळी गाठली आहे. गावातल्या लोकांसाठी निश्‍चितच ही आनंदवार्ता आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने मानगावमध्ये पाण्याची खुप टंचाई जाणवू लागली होती. याही वर्षी सुरुवातीला पावसाची चिन्हे दिसत नव्हती. गावाला दुष्काळाची भीती वाटू लागली होती. शेतकऱ्यांची अवस्था खुप वाईट झाली होती; परंतु ऑगस्ट महीना मात्र गावकऱ्यांसाठी आनंदाचा ठरला आहे. गेले चार दिवस मानगाव येथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाने आपला जोर वाढवला आहे. तलावक्षेत्रात दोन दिवस चांगलाच पाऊस झाल्याने तलाव ओसंडून वाहत आहेत. गावकऱ्यांची पाण्याची चिंता संपली असून आनंदही तलावांसारखाच ओसंडत आहे.

shaalaa.com
बातमी लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: उपयोजित लेखन - बातमी लेखन [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 15 उपयोजित लेखन
बातमी लेखन | Q कृती १ | पृष्ठ ४९

संबंधित प्रश्न

खालील शीर्षकावरून बातमी तयार करा.

शाळेत वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर

वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×