हिंदी

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा: अभिनव विद्यालय, नागपूर‘ भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत अध्यक्ष - श्री. सुहास माने - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.
दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर
वेळ स. 11 ते सं. 5 वाजेपर्यंत
अध्यक्ष - श्री. सुहास माने
प्रमुख पाहुणे - श्री. आशिष वाघ

  • एकूण 50 शाळांचा सहभाग
  • उद्घाटन सोहळा संपन्न
  • उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके
  • विज्ञान नाटिका सादर
लेखन कौशल

उत्तर

दैनिक लोकपत्र

अभिनव विद्यालय, नागपूर
‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ संपन्न.

दि. 24 ऑक्टोबर 2015
आमच्या वार्ताहराकडून, नागपूर

नागपूरच्या अभिनव विद्यालयात 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्याचे औचित्य साधून 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन येथील शास्त्र महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्रमुख पाहुणे श्री. आशिष वाघ यांच्या हस्ते झाले, तर शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुहास माने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या प्रदर्शनात अनेक वैज्ञानिक प्रयोग, विज्ञानविषयक साहित्य आणि तक्ते सादर करण्यात आले होते. 50 शाळांनी यात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, प्रकाश, बी-बियाणे आणि मानवाचे आरोग्य यांसारख्या विषयांवर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवले होते. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रदर्शन पाहण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

विशेष प्रकल्पांमध्ये एका विद्यार्थ्याने शेतात बी पेरणीसाठी उपयुक्त बहुउद्देशीय सायकल तयार केली होती, ज्याचे उत्कृष्ट वर्णन त्या विद्यार्थ्याने केले. प्रा. सुरेश देशमुख आणि डॉ. विलास राणे यांनी प्रकल्पांचे परीक्षण करून उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली आणि त्यानंतर विज्ञान विषयाचे श्री. जयेश जोशी यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली "मज विज्ञानाचे पंख हवे" ही नाटिका सादर करण्यात आली. अध्यक्ष श्री. सुहास माने यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर प्रमुख पाहुणे श्री. आशिष वाघ यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले.

shaalaa.com
बातमी लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.

कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.


पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.

बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

आदर्श विद्यालय

रवीनगर, गडचिरोली

‘विज्ञानदिन सोहळा’

विज्ञानदिनानिमित्त

वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटक - डॉ. श्री. विजय आफळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख

सिटी कॉलेज, गडचिरोली

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.

विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.


खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे.

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×