Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:
एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.
उत्तर
प्रामाणिकपणाचे फळ
रामपूर नावाच्या एका गावात किशोर नावाचा एका मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. त्याची आई लोकांच्या शेतावर मोलमजुरीची कामे करत असे परंतु त्या कामातून किशोर आणि त्याच्या आईचा उदरनिर्वाह नीट होत नसे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे किशोरला शाळेची फी भरण्यासाठी ही पैसे नव्हते परंतु त्याला शिक्षणाची आवड होती व आपले शिक्षण अर्धवट राहू नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. घरची आर्थिक परिस्थिती समजून घेतल्याने त्याला शाळेचा खर्च अशक्य वाटू लागल्यामुळे त्याने आपल्या आईला आर्थिक हातभार लावण्याचे ठरविले.
किशोर हा हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. घरच्या आर्थिक परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना होती व शाळा ही अर्धवट सोडायची नव्हती म्हणून तो शाळेच्या वेळेच्या आधी सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम करू लागला. या कामामुळे मिळालेल्या पगारातून त्याला शाळेची फी भरण्यासाठी थोडी मदत होऊ लागली.
एके दिवशी किशोर असाच त्याचे पेपर वाटण्याचे काम करीत असतानाच वाटेत त्याला एक पैशाचे पाकीट पडलेले दिसले. ते पैशाचे पाकीट उचल्यावर ते खूप भरलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी तो एका क्षणाचाही विलंब न करता काही अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये जावून त्याने ते पैशाने भरलेले पाकीट तेथील पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ते पाकीट तपासल्यावर त्यामध्ये त्याच्या मालकाचे ओळखपत्र सापडले व त्याला पोलिसांनी बोलावून घेतले आणि त्याचे पाकीट त्याच्या स्वाधीन केले.
आपले हरवलेले पाकीट पुन्हा सापडलेले बघून तो मनुष्य फारच आनंदी झाला. पोलिसांनी त्याला त्याचे हरवलेले पाकीट किशोरने कसे परत मिळवून दिले याची संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्या माणसाने किशोरच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक करून त्याचे आभारही मानले व त्याचबरोबर त्याने किशोरला बक्षीस ही दिले.
किशोरला मिळालेले हे बक्षीस म्हणजेच त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ होते. किशोरने केलेली ही कामगिरी ऐकल्यावर त्याची आई आणि शाळेतील शिक्षक ही खूप आनंदी झाले.
तात्पर्य: प्रामाणिकपणा ही माणसाची खरी संपत्ती आहे: कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा टिकवणं महत्त्वाचं आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.
दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि .... |
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
गरीब शेतकरी ______ कोरडवाहू जमीन ______ कठोर परिश्रम ______ शेतीत नवनवीन प्रयोग ______ उत्पन्नात भरभराट ______ यशस्विता ______ आनंद ______ इतरांना मार्गदर्शन ______ राष्ट्रीय पुरस्कार ______ बोध.
खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.
खालील कथालेखन करा.
रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
बुद्धी आणि ताकदीचा मेळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पळसाला पाने तीनच
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
विज्ञानाची कास धरा
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळ्या अशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी ________ |
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
हट्टी राजकन्या | त्याला अर्धे राज्य मिळते |
`↓` | `↑` |
राज्यकन्येची अट | शेतकऱ्याचा मुलगा येतो |
`↓` | `↑` |
न संपणारी गोष्ट सांगणे | बरेच जण प्रयत्न करतात |
`↓` | `↑` |
राज्यात दवंडी अर्धे राज्य |
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि .....
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.
आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि... |
तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.
तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटीत्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ... |
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.