Advertisements
Advertisements
प्रश्न
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
उत्तर
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीचे, निशाचे, मनापासून कौतुक केले - तेही जाहीरपणे. हे कौतुक करताना त्यांनी स्वत:मधील उणीवही मान्य केली. लोकांना बरे वाटावे, त्यांची मने दुखवू नयेत, म्हणून त्या गोड गोड बोलत राहिल्या. सामाजिकदृष्ट्या योग्य सल्ला त्यांनी दिला नाही. समाजाचे वातावरण निकोप व्हावे, स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळावे, हे त्यांना ओळखता आले नाही. ही उणीव त्यांनी मान्य केली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होय.
निशाने समाजाला क्विनाईनचा डोस दिला. क्विनाईन हे अत्यंत कडू असे औषध आहे. निशाचा सल्ला क्विनाईनसारखा होता. तिच्या सल्ल्यामध्ये सामाजिक सुधारणा करण्याची मोठी शक्ती होती. सामाजिक सुधारणा कोणताही समाज सहजासहजी मान्य करीत नाही. किंबहुना खूप विरोध करतो. अशा वेळी समाजाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला फार मोठे धाडस लागते. या धाडसामुळे आपण समाजामध्ये अप्रिय होण्याची शक्यता असते. आपली प्रतिमा अप्रिय करून घ्यायला बहसंख्य लोक तयार नसतात. उषावहिनीसुद्धा असे धाडस दाखवू शकल्या नाहीत. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी बंडखोर स्वभावाची गरज असते. असा स्वभाव निशाकडे आहे. म्हणून तिने केवळ एका दिवसाची संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आपल्यालासुद्धा समाजात काही बदल करायचे असल्यास निशासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि तीसुद्धा वेळ न गमावता घेतली पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,
वैशिष्ट्येलिहा.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.
आकृत्या पूर्ण करा.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
- मन:पटलावरील प्रतिमा
- 'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
चुकीचे विधान शोधा.
चुकीचे विधान शोधा.
फरक स्पष्ट करा.
नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
घटना/कृत | परिणाम |
नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.