Advertisements
Advertisements
प्रश्न
'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या.
उत्तर
कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळू दे तारे ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता की स्वर्गातून कोसळलेला, सूड-समाधान मिळाया प्रमत्त सैतान पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती आणि सहकार्यानो, का ही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाणा कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा घराची वा वितभर कारा चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळया सागराला. |
कोलंबसाचे गर्वगीत ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची विशाखा या काव्यसंग्रहातील एक अतिशय दर्जेदार कविता आहे. हजारो वर्षापासून निसर्गाच्या क्रूर संकटांना समोर जाऊन माणसांनी विजिगिषु वृत्तीने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. या कवितेत कुसुमाग्रज साहसी दर्यावरती कोलंबसाची कथा सांगत आहेत.