Advertisements
Advertisements
प्रश्न
क्रेब्ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.
उत्तर
क्रेब्ज चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब्ज या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. अँसेटिल-को एन्झाइम-A चे रेणू ऑक्झॅलो असेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात. त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोअंसेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब्ज चक्रालाच सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात.
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
शास्त्रीय कारण लिहा.
काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.