Advertisements
Advertisements
प्रश्न
(मातीची सावली) पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर
फरसू एक कठोर परिश्रम करणारा गरीब शेतकरी होता. त्याची आणि त्याच्या पत्नीची शेतातील कष्टाची कहाणी अत्यंत प्रेरणादायी होती. फरसू या मातीशी असलेल्या नात्यातच खरी मानवता असल्याचं मानत होता. त्याचे जमिनीवर आणि झाडांवर अत्यंत प्रेम होते. त्याचा दृढ निश्चय होता की, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जमिनीची सेवा करणे आणि झाडांना नष्ट न करणे. हा विचार अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक दृष्टिकोन आहे. मला हा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो. आजकाल शिक्षणाच्या प्रसारामुळे अनेक लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला मागत नाहीत. शेती आणि झाडांची किंमत कमी समजली जाते आणि कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. पर्यावरणाचे नुकसान होत आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्या प्रदूषित होऊन त्यांची गटारे झाली आहेत. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर जात आहे आणि त्यामुळेच त्याचे निसर्गापासूनचे देखील नाते तुटत चालले आहे. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
खालील तक्ता पूर्ण करा.
घटना | परिणाम/प्रतिक्रिया |
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. | |
(२) मनूला फरसूने शिकवले. | |
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. | |
(४) मनूने जमीन विकायला काढली. |
आकृती पूर्ण करा.
(मातीची सावली) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.
ओघतक्ता तयार करा.
ओघतक्ता तयार करा.
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.