हिंदी

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

दीर्घउत्तर

उत्तर

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’

निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे. माणसाने या साऱ्याचा आपल्या प्रगतीसाठी, सुखसमाधानासाठी पुरेपूर वापर करून घेतला आहे; किंबहुना माणसाने निसर्गपासून जे जे मिळाले ते ते ओरबाडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे, निसर्ग आणि पर्यावरण धोक्यात असल्याचे दिसून येते. माणसाने साऱ्या सजीवसृष्टीचा विचार करून पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन करण्याची आवश्यकता आहे.

जे जे मोफत मिळते त्याची माणसाला किंमत कळत नाही. त्याचा वारेमाप वापर करणे किंवा नाश करण्याच्या वृत्तीमुळे सजीवांच्या पर्यायाने माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माणसाने हवा मोफत मिळते म्हणून तिच्या शुद्ध राहण्याकडे दुर्लक्ष केले. झाडे तोडली. कारखान्यातून विषारी वायू प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात हवेत सोडले. झाडे तोडल्यानंतर नवीन झाडे लावली नाहीत. पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे - जे कार्बन डायऑक्साइड घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजेच माणसाने झाडे तोडून आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण तर कमी केलेच त्याचबरोबर वातावरणातले कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढवले. झाडाच्या प्रचंड प्रमाणातील कत्तलीमुळे जलचक्रामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आपल्याला ऐषोआराम मिळावा म्हणून मानवाने पर्यावरणाची न भरून निघणारी हानी केली आहे.

माणूस गुहेत राहताना इतर प्राण्यांना घाबरून लपून राहत होता. पुढे आपल्या बुद्धीच्या जोरावर जवळपास सर्वच प्राण्यांना मानवाने अंकित केले. शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने केवळ हौशेसाठी विविध प्राण्यांची शिकार केल्यामुळे काही प्राणी किंवा प्राण्यांच्या विशिष्ट जाती धोक्यात आल्या आहेत अथवा नष्ट झाल्या आहेत. आपण सारे सजीव या पृथ्वीची लेकरे आहोत आणि प्रत्येकाचे अस्तित्व पृथ्वीवरच्या पर्यावरणाच्या दुष्टीने महत्त्वाचे आहे ही गोष्टच माणूस विसरून गेला आहे. जलप्रदूषण ही पर्यावरण जतन करण्यामधील दुसरी मोठी समस्या आहे. पाण्याचा अयोग्य वापर, रसायनमिश्रित किंवा सांडपाण्यामुळे वाया जाणारे पिण्यायोग्य पाणी, मोटमोठ्या नद्यांना आलेले गटार किंवा नाल्याचे स्वरूप यांमुळे त्यातील जलसंपत्तीचे, जलचरांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे मानवालाही स्वास्थ्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, पिण्यायोग्य पाण्याची टंचाईही याचाच परिणाम आहे.

पर्यावरणाचा विचार केला, तर पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट त्याचा भाग आहे. अतिहव्यासापोटी माणसाने स्वार्थी वृत्तीने डोंगर, नदी, समुद्र, झाडे, पशू-पक्षी यांचा नाश केला, तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे. यंत्रतंत्राच्या साहाय्याने निसर्गावर विजय मिळून पाहणाऱ्या मानवाला कोरोनासारख्या एका न दिसणाऱ्या विषाणूने दिलेला धोबीपछाड हा एक संकेत आहे. माणसाने जागे होऊन पर्यावरणाची काळजी घेणे, जतन करणे ही काळाची गरज आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×