Advertisements
Advertisements
प्रश्न
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
उत्तर
अकस्मात पडलेला पाऊस
मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू होता. अतिशय कडक ऊन पडले होते. सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून, हनुवटीखालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जिवाची काहिली होत होती. बसून पाहिले. उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात, भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार-गार वारा सुटला.
जमिनीवरील कागदकपटे, पालापाचोळा हवेत घुसळू लागले आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले. एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस इंदडत होता. आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो, मनसोक्त नाचू लागलो. खरे सांगू का? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता. एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो. दारे-खिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्र्या उघडतो. पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो.
आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता, हे सांगणे कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती. मी मित्रमंडळींकडे पाहिले. सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. ते दृश्य मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती? आणि आता पाहा. पावसाने केवढा कायापालट केला होता! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.