हिंदी

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा: आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान

लेखन कौशल

उत्तर

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान

आज २१ व्या शतकात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. इ. सन पूर्वच्या काळात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. राजाराममोहन रॉय व ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या अडचणी समजून त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला. महात्मा फुले यांनी स्वतःच्या बायकोला सावित्रीबाई फुले यांना शिकवून पुण्यात मुलींसाठी पहिली मुलींची शाळा काढली यामुळे शिक्षणाचे महत्तव मुलींना कळले व त्यामुळे आज २१ व्या शतकातसुध्दा स्त्रिया या पुरूषांच्या बरोबरीने शिकून मोठमोठ्या अधिकारी पदांवर काम करताना दिसत आहेत. राजाराममोहन रॉय यांनी विधवा पुर्नविवाह याला पाठिंबा दिल्यामुळे आजच्या काळात सुध्दा स्त्रियांचे पुर्नविवाह होत आहेत. इ. स. पूर्व मध्ये हुंडाबळी ही समस्यासुध्दा होतीच पण आजसुध्दा २१ व्या शतकात स्त्रियांना हुंडाबळी या समस्येला सामोरे जावे लागते. या हुंड्यामुळे कित्येक मुलींचे आणि त्यांच्या आई-बाबांचे आयुष्य उध्वस्त होते. हुंड्यामुळे कित्येक मुलींना शारीरीक, मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम त्या मुलींच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच शारीरीक स्वास्थ्यावर होतोच शिवाय त्या मुलींच्या घरच्यांनासुध्दा सहन करावा लागतो. या सर्वामुळे तिच्या घरच्यांनासुध्दा खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो. काही ठिकाणी मुली कितीही शिकल्या तरी त्यांना या सर्व त्रासांमुळे स्वतःचा जीव गमावून आयुष्य संपवावे लागते.

स्त्रियांच्या बाबतीत आज २१ व्या शतकात फक्त चूल आणि मूल अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. स्त्रियांनी अनेक छोटे-छाेटे उद्योग घरच्या घरी करून त्यातूनसुध्दा मानाचे स्थान मिळवले आहे. आजच्या २१ व्या शतकात मुली किंवा स्त्रिया या स्वतंत्र विचारांच्या जरी असल्या तरी त्यांनी त्यांची मर्यादा ओळखून वागायला हवे, त्यामुळे विनयभंग, बलात्कार अशा समस्या उद्भवणार नाहीत असे वाटते. स्त्रिया या सर्व कुटूंबाची जबाबदारी स्वीकारून नोकरी करतात. त्यावेळी घरच्यांनीसुध्दा पाठिंबा दिल्यामुळे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीरपणे सिद्ध करू शकतात. शिक्षणामुळे त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पहायला मिळते. या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोज सकाळी लवकर उठून घरच्यांसाठी जेवण करून मुलांचे सर्व नीट करून एखादी स्त्रीही जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षित घरी येऊ शकते का? याचा सर्वानी विचार करावा. आजकाल स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात. स्त्री ही मुळातच सहनशील असते म्हणून तिने होणाऱ्या अत्याचारांना सहन करणे हे योग्य नाहीये ना?

आज स्त्रियांवर खूप अत्याचार होताना दिसतात. काही वेळेला तर स्त्रियांना खुप घाणेरडे असे अश्लील विनाेदांना सामोरे जावे लागते, तसेच अतिशय वाईट कमेंन्ट्सना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार करताना आणखी एका महत्त्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे मोठ्या मुली किंवा स्त्रियांना जसे बलात्काराचा सामना करावा लागतो तसेच कितीतरी नि:श्पाप जीवांना सुध्दा म्हणजेच २/३ वर्षाच्या मुलींना सुध्दा ह्या बलात्काराचा सामना करावा लागतो. या सर्वामध्ये त्यांची काही चूक नसते तरी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्यावेळी अशा सर्व गोष्टी घडतात तेव्हा असे कृत्य करताना त्या व्यक्तींना कसलीही लाज का वाटत नाही असा प्रश्न निर्माण होतो? या सर्व गोष्टी करताना काही वेळेला नातेवाईक या सर्वाला कारणीभूत असतात. कोणीही कसलीही पर्वा करत नाही. या सर्वामुळे स्त्रियांची सुरक्षितता करणे हे सर्वस्वी त्या स्त्रीचे जसे कर्तव्य आहे तसेच इतरांचेही कर्तव्य आहे असे मला वाटते. सर्वानीच स्त्रियांना मानाने, आदराने वागवावे अशी विनंती स्त्रीही अनेक बाबतीत जशी स्वतंत्र विचारांची असते तसेच इतरांनीही तिला समजून घ्यावे. आजच्या काळात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात काम करून नाव कमावले आहे याचा सर्वानी आदर करावा.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध

माझा आवडता कलावंत.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


नमुना कृती:


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


आदर्श विद्यालय, कोल्हापूर
‘मराठी भाषा दिन’ सोहळा

दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता

  • काव्यवाचन
  • कथाकथन
  • नाट्यप्रयोग
  • गीतगायन

विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी.

वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×