हिंदी

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

प्रदूषण - एक समस्या

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जस-जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तस-तसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत. ‘प्रदूषण’ हा असाच तंत्रज्ञानाच्या एक दुष्परिणाम आहे. आज प्रदूषण एक समस्या बनलेली आहे.

आपल्या धरतीवर आज तीन तऱ्हेचे प्रदूषण आहे: जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. विकसनशील देश जसे भारत, थायलँड, पाकिस्तान आणि अन्य अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचे योग्य वापर न करणे आणि अधिक तांत्रिक माहिती माहीत नसलेले हे देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास असमर्थ आहेत. याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पानी प्यायल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात. म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रू आहे.

आज मोठ-मोठे शहर वाढते मोटरसायकल, चारचाकी वाहने आणि इतर मोटार वाहनांमुळे वायु प्रदूषणाचा सामना करत आहेत. विकसित झालेल्या शहरात औद्योगिकरणाच्या दर हा खूप अधिक असतो. यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात अयशस्वी होतो. कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनच्या आभाव झाल्याने श्वासांसंबंधी रोग व्हायला लागतात. बऱ्याचदा हे प्रदूषण अधिक झाल्याने हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

ध्वनि प्रदूषण हे सुद्धा वायुप्रदूषणा एवढेच घातक आहे. मोठ मोठ्या महानगरात वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनि प्रदूषण वाढते. बहिरेपणा, मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत. आज ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आवाजात स्पीकर आणि बँड वाजविण्यावर बंदी आणायला हवी. मनुष्य निसर्गाला विषारी करीत आहे, जर मनुष्य स्वतः वेळीच सावध झाला नाही तर त्याला या प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यापासून कोणीच वाचवू शकत नाही.

प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायक तर आहेच पण या सोबत वनस्पती आणि प्राण्यांना ही ते घातक आहे. प्रदूषण मानवजातीसाठी एक समस्या आहे. जोपर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होणाऱ्या या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी उपाय शोधून घेत नाही तोपर्यंत मानवी जीवन धोक्यात आहे. शासनाने याची दखल घ्यायला हवी आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड, जल शुद्धीकरण, गॅस वर चालणारे चुल्हे इत्यादी उपक्रम राबवायला हवेत. आपल्याला प्रदूषणाशी लढा देऊन त्याला कोणत्याही किमतीवर संपवायचे आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×