Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
उत्तर
मी फुलवलेली बाग
बागेचे सौंदर्य मनावर जादू करत आहे, असे वाटत होते, कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन म्हणजे अतिशय कंटाळवाणा काळ होता; पण मला मात्र या काळात आपली आवड जपण्याची नामी संधीच मिळाली. ती आवड प्रत्यक्षात अवतरली ती आमच्या गॅलरीमध्ये फुलवलेल्या बागेच्या रूपात! आजोबांनी पाठिंबा दिला आणि माझी बागकामाची सुरुवात झाली. आमच्या अडगळीच्या सामानात प्लॉस्टिकचे मोठे ट्रे होते. त्यामध्ये माती भरून घेतली. जवळच एक फूलझाडांची नर्सरी आहे. मी जमवलेल्या पैशांतून आजोबांच्या सोबतीने तेथून काही फूलझाडे विकत आणली. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली या रोपांची मी लागवड केली. त्यांना खतपाणी घालणे, त्यांची निगा राखण्याचे काम मला एक विलक्षण आनंद मिळवून देत होते.
बागकामातला माझा उत्साह बघून हळूहळू कुटुंबियांनीही आपले सहकार्य सुरू केले. आई पाणी घालण्याच्या वेळी मदत करू लागली. बाबांनी एक छोटी झारी आणि खुरपे आणून दिले. बागकामासाठी सेंद्रिय खताचा वापर करण्याचा सल्ला दादाने दिला. त्यासाठी आम्ही कोथिंबीर किंवा इतर भाज्यांच्या न वापरलेल्या भागांचा उपयोग खत म्हणून करू लागलो. डाळींचे पाणी, तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी, चहाचा गाळ यांचा वापर खत म्हणून केला. मासे धुतल्यानंतर त्याचे पाणी घातल्याचा चांगलाच परिणाम दिसून आला.
चमेली आणि जुही, गुलाब यांसारख्या अनेक फुलांनी बागेला सुशोभित केले होते. रंगीबेरंगी फुलांचे हास्य फुलताना पाहून आयुष्यातील खऱ्या आनंदाची जाणीव झाली. पुढे भाजीपाला लागवड करण्याची इच्छा निर्माण झाली. आजोबांनी मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो घरच्याघरी कसे पिकवायचे ते सांगितले. मेथी पेरली. कोथिंबिरीसाठी धणे फोडून पेरले. मिरची आणि टोमॅटोच्या बिया टाकून ठेवल्या. थोड्याच दिवसांत मेथीची भाजी छानपैकी तयार झाली. ती मेथीची भाजी काढून आईला दिल्यानंतर आणि त्याची भाजी खाल्यानंतर काय आनंद झाला म्हणून सांगू!
झाडांना पाणी देत होतो. बागेत फुलांचा सुगंध होता तर हृदयात आनंदाचा संचार. मिरची, टोमॅटोची रोपे चांगलीच तयार झाली. मेथी पाठोपाठ आम्ही कोथिंबीर जेवणात वापरली. झेंडूची फुले, गुलाबाची फुले नेहमीच्या पूजेसाठी मिळू लागली. एके दिवशी मिरचीच्या रोपांवर पांढऱ्या रंगाची फुले दिसली. आजोबा म्हणाले, “राजे, तुमच्या बागेत मिरच्या येणार बरं का.” मिरच्यांच्या फुलांपासून मिरच्या तयार होण्याचा प्रवास मी रोज न्याहाळत होतो. आई मध्येच चिडून काय सारखं सारखं झाडांना त्रास देतोस, म्हणून ओरडायची. घरातले सारेच जण माझे आणि माझ्या बागेचे कौतुक करत होते. दादाने त्याच्या सोशल मीडियावर माझ्या बागेचे फोटो टाकल्यावर त्याला खूप 'लाइक्स' आल्या. मला या साऱ्यातून एक वेगळेच समाधान मिळाले. आपण काहीतरी नवनिर्मिती शिकलो अशी भावना निर्माण झाली.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.