Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
उत्तर
मी शाळेची घंटा बोलतेय
रोज सकाळी ठणठणाट करून मुलांना पळापळ करायला लावणारी अशी मी कोण आहे बरे? चकचकीत पितळी शरीराची, भलीमोठी, शाळेच्या आवारात टांगलेली अशी मी कोण आहे बरे? अहो, मी आहे शाळेतली घंटा.
रोज सकाळी साडेसात वाजता मी नित्य नेमाने वाजते. तेव्हा सगळी मुले धावतपळत वर्गात येऊन बसलेली असतात. त्यानंतर प्रार्थना होते. मी ठणठणाट केल्यावरही जी मुले उशीरा येतात त्यांना शिक्षा भोगावी लागते. कारण वेळ पाळण्याचे महत्व किती आहे ही शिस्त मुलांच्या अंगी लहानपणीच बाणवणे हेच तर शाळेचे कर्तव्य असतेना.
शाळा सुरू झाली की माझे काम संपले असे होत नाही बरे का! त्यानंतर प्रत्येक तासातासाला घंटा होते. तेव्हा एक शिक्षक आपला तास संपवून जातात आणि दुसरा विषय शिकवायला पुढले शिक्षक येतात. अशा रीतीने वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषय रोज झाले पाहिजेत ह्यासाठी माझे योगदान किती आहे हे तुम्हाला आता कळले असेलच.
त्याशिवाय छोटी सुट्टी, मधली सुट्टी आणि शाळा संपते तेव्हाही मीच मोठ्याने ठणठणाट करते मात्र सुट्टी सुरू झाल्याचा ठणठणाट मी केला की सगळी मुले हो… असा मोठा आवाज करून उठतात.
कित्येक मुलांना पटापट डबा खाऊन शाळेच्या मैदानावर खेळायला जायचे असते. त्यांचे खेळणे बघायला मलाही आवडते पण काय करणार? सुट्टीची वेळ संपली की मला परत ठणठणाट करावा लागतोच ना? तेव्हा पाय ओढत मुले वर्गात परततात. पण गंमत म्हणजे तीच मुले शाळा सुटण्याचा ठणठणाट केला की पुन्हा धावायला आणि आरडाओरडा करायला तयार असतातच. तेव्हा मलाही बरे वाटते.
माझे आणि शाळेतल्या शिपाईदादांचे जवळचे नाते आहे. कारण शिपाईदादांनी जर माझे टोले वेळेवर दिलेच नाहीत तर मी तरी कशी काय वाजणार? आमच्या शाळेतले श्यामभाऊ शिपाई आहेत त्यांच्याकडे हे जबाबदारीचे काम सोपवले गेले आहे. ते गेली कित्येक वर्षे नियमितपणे हे काम करीत आहेत. किती मुले आली आणि गेली परंतु मी मात्र वर्षानुवर्षांपासून माझे काम करीत आले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.